कारागृह उद्योग

दस्तऐवज

कारागृह उद्योग आरक्षीत वस्तू

शासन निर्णय, क्रमांक भाखस-1087(2440)/31250/उद्योग-6, दिनांक 26 ऑगस्ट 1987, 2 जानेवारी 1992 व 7 मार्च 2002 अन्वये सत्तर (70) वस्तुंचा अंतर्भाव कारागृह निर्मित वस्तूंमध्ये झाला आहे.
1. सागवानी लाकडांच्या खिडक्यादरवाजे वस्तू
2. टेरीकॉटच्या बेडशीट व खिडक्यादरवाजांचे पडदे ईत्यादी.
3. बँडेज कापड
4. लोखंडाच्या खिडक्या, दरवाजे व तत्सम वस्तू.
5. कार्यालय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहांसाठी लागणार्‍या सतरंज्या वगैरे.
6. मेणबत्या
7. होजिअरीच्या वस्तू
8. कपडे धुण्याची पावडर, वॉशिंग पावडर, डिटर्जंट पावडर आणी केक.
9. चर्मोद्योग
10. बेकरी.
 
शासन निर्णय, क्रमांक भाखस-1088(2512)/उद्योग-6, दिनांक 2 जानेवारी 1992 नुसार खालील  वस्तुंचा अंतर्भाव कारागृह निर्मित वस्तूंमध्ये झाला आहे.
1. स्टील फोल्डींग कोट्स (प्लेन)
2. स्टील फोल्डींग कोट्स (क्रिसक्रास)
3. मॉस्क्युटो नेट्स
4. बरॅक ब्लॅंकेट.

 
शासन निर्णय, क्रमांक भाखस-2002(2975)/उद्योग-6, दिनांक 7 मार्च 2002 नुसार खालील  वस्तुंचा अंतर्भाव कारागृह निर्मित वस्तूंमध्ये झाला आहे.
1. पुर्व शालेय संच : (1) क्रेयोस (2) भिंती पत्रे / चित्रे इत्यादी.
2. कोठी : वेग वेगळ्या साईजचे.
3. डिस्प्ले बोर्ड : वेग वेगळ्या साईजचे.
4. क्रिडा साहित्य
5. भांडी : हिंडोलिअम / अल्युमिनियम / स्टेनलेस स्टील.

 

कारागृह उद्योग

महाराष्ट्र कारागृह उद्योग ही सुधारणात्मक संस्था आहे. महाराष्ट्र कारागृह उद्योगाचा प्रमुख उद्देश बंद्यांना विविध उद्योगात कार्यमग्न ठेवणे व त्याद्वारे त्यांना कौशल्य प्राप्त करुन देत त्यांची सुधारणा व पुर्नवसन करणे हा आहे.
             महाराष्ट्र कारागृह उद्योगाचा विस्तार हा चार प्रादेशिक विभागातील एकुण 09 कारागृहांत आहे. त्यामध्ये 7 मध्यवर्ती कारागृहे, 1 जिल्हा कारागृह वर्ग-1 व 1 खुले जिल्हा कारागृह आहे. त्याचे विवरण खालीलप्रमाणे आहे.

1. पश्चिम विभाग, पुणे
                येरवडा मध्यवर्ती कारागृह
                कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह
                येरवडा खुले जिल्हा कारागृह
2. दक्षिण विभाग, मुंबई           
                 ठाणे मध्यवर्ती कारागृह
3. मध्य विभाग, औरंगाबाद
                 औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह
                 नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह
                 धुळे जिल्हा कारागृह
4. पूर्व विभाग, नागपूर             
                नागपूर मध्यवर्ती कारागृह
                अमरावती मध्यवर्ती कारागृह

 कारागृहातील बंद्यांना कारागृहाच्या आतील भागात तसेच कारागृहाच्या बाहेरही काम देण्यात येते. बंद्यांचे कार्य सकाळी 8 ते 10.30 व 11.30 ते 16.30 या दरम्यान चालते.

बंद्यांना विविध तांत्रिक व व्यावसायिक कौशल्यात प्रशिक्षण देण्यात येते. त्याचे विवरण खालीलप्रमाणे -

1. सुतारकाम
2. लोहारकाम
3. चर्मकला
4. वस्त्रोद्योग- अ) कापड विणणे  ब) दरी विणणे    क) रंगकाम
5. शिवणकाम
6. कागदकाम
7. रसायन
8. बेकरी
9. मोटार वाशिंग सेंटर
10. धोबीकाम
  • कारागृह उद्योगामध्ये सुमारे 2200 बंद्यांना उपरोक्त विविध उद्योगात रोजगार देण्यात येतो, तर काही बंद्यांना कारागृह शेती, शासकीय मुद्रणालय, आकस्मिक विभाग, साफसफाई, स्वयंपाकगृह इ. ठिकाणी रोजगार देण्यात येतो.
  • आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणेकरिता महाराष्ट्र कारागृह विभागाने नुकतेच 'जॉबवर्क' या पी.पी.पी. मॉड्युलचा स्विकार केला आहे. त्याद्वारे बंद्यांना भविष्यात रोजगाराच्या संधी प्राप्त होतील.