Close

    प्रस्तावना

    महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा विभागाचे मुख्यालय पुणे येथे असून सदर विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अधिपत्याखाली कार्य करतो. या विभागामार्फत ५ प्रादेशिक कार्यालये, १ राज्य प्रशिक्षण केंद्र (५ उप-केंद्रांसह) आणि ६० विविध प्रकारची कारागृहे व सुधार संस्थांचे संचालन व देखरेख केली जाते. या संस्थांमध्ये मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे, खुली कारागृहे, खुली वसाहत आणि बालसुधारगृह यांचा समावेश आहे.
    महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कारागृहांचे प्रशासन, व्यवस्थापन व सुधारणा यासाठी जबाबदार असलेली वैधानिक संस्था आहे. हा विभाग महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा अधिनियम, २०२४ आणि महाराष्ट्र कारागृह नियमावली, १९७९ अंतर्गत कार्य करतो. कारागृह प्रशासनाच्या क्षेत्रात, शिक्षात्मक दृष्टिकोनातून सुधारात्मक व पुनर्वसनात्मक दृष्टिकोनाकडे एक प्रगत व परिवर्तनशील वाटचाल या विभागाने आरंभ केली आहे.