माहिती
महाराष्ट्र तुरूंग विभागात ९ मध्यवर्ती तुरूंग, 31 जिल्हा तुरूंग, 19 खुले तुरूंग,१ खुली वसाहत आणि १७२ उप-तुरूंगांचा समावेश होतो.पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तुरूंग आहे. पुणे व अकोलामध्ये महिलांसाठी खुले तुरूंग आहे. महाराष्ट्र तुरूंग विभागाचे मुख्यालय पुण्यात असून राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे.तुरूंग विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करतो.
सध्या अस्तित्त्वात असलेल्या तुरूंगांमध्ये अधिक बराकी बांधायचे कामही सुरू आहे. नवीन तुरूंग आणि बराकी बांधायचे तसेच आधीच्या तुरूंग परिसरातील बांधकामाच्या दुरूस्तीचे काम, सार्वजनिक बांधकाम विभाग करीत आहे. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन निधी उभारते. तुरूंगात राहणाऱ्यांसाठी सध्याच्या सुविधा आणि सुखसोयी वाढवण्यासाठी राज्य तुरूंग विभागाला तेराव्या वित्त आयोगाकडून निधी प्राप्त झाला आहे.